रंगीत माणसे

Started by शिवाजी सांगळे, January 05, 2018, 08:37:25 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रंगीत माणसे

मोजतो स्वतःस का विविध रंगी रंगानं?
बाटविले का न आम्हाला या तिरंग्यानं?

जगलो गुण्यागोविंदाने आपण सगळे !
कसे बिथरवले पुन्हा एकदा फिरंग्यान?

कुठे वारसा उज्वल इतिहासाचा गेला?
पोकळ का ईतका तुटे एका धक्क्यानं

शिकवणी विसरून सारी आम्ही संतांची   
का भडकतो लावताची आग पुढाऱ्यानं?

विखुरल्या माणसां रंगात जातीयतेच्या
गुंफू सगळ्यांना समानतेच्या धाग्यानं !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

संजय जोशी

Khupach Chhan Shivaji Sir ... Aani prasangik pan aahe ... Mi Mumbai la astanna Maharashtra bandh cha anubhav ghetala .... Ka rajkarani divide karanyache kam karat aahet ..... Aapan sagale bhavanda aahot .... chal eik nava desh ghadvuya ... rajkarnyanchi karasthana modit kadhuya !!

शिवाजी सांगळे

मनस्वी धन्यवाद संजयजी, दंगली, बंद सारख्या गोष्टीत खरं तर सामान्य माणुस होळपळतो. त्यातल्याच काही. लोकांना ते अंधानुकरण करतात हे कळतच नाही. राजकीय नेते अशा लोकांना मिसगाईड करून आपली पोळी भाजून घेतात.
पुनश्च धन्यवाद.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९