"माझ्या मनातील व्यथा"

Started by Hardik, January 17, 2018, 06:39:34 PM

Previous topic - Next topic

Hardik

फूल तोडायचे होते तर
कळी खूडलीस कशाला ?
सूर-बेसूर करायचा होता तर
सतार छेडलीस कशाला?
प्रेम करायचे नव्हते तर
नयनांचे खेळ खेळलीस कशाला ?
मला प्रिया म्हणायचे नव्हते तर
ओळख दिलीस कशाला ?
कशी सांगू मी तुला मनाची कळकळ
पाहताच तुला होते मनात धडधड..
तू माझ्यावर रागवतेस खरी
पण ,माझ्या मनाची व्यथा जाणतेस तरी..
एक दिवस तुला पाहिल्याविना माझा जात नाही
एक रात्र अशी नाही तिथे तुझी आठवण आली नाही...
कळेल तुला माझे प्रेम
तेव्हा ती वेळ गेलेली असेल...
कळेल तुला जगण्याची खरी रीत
तेव्हा ती वेळ गेलेली असेल...
दुःख त्याचे नाही कि तू माझी नाहीस
दुःख याचे आहे कि मि तुला विसरु शकत नाही...
मनातील व्यथा व्यक्त करताना
‌नयनी अश्रू तरळू  लागले..... :'( :'(
     Hardik D. Shah(Mumbai)
      hdshah86@gmail.com