तो क्षण

Started by Unknown_writer, January 20, 2018, 07:02:32 PM

Previous topic - Next topic

Unknown_writer


तो क्षण

CHAPTER 1(part 1)

"आई, please रडू नकोस, मी भेटायला येईन आणि रोज कॉल करायला विसरणार नाहि. काळजी करु नकोस" मी ट्रेनच्या दारात उभी राहून आईला सांगत होते , आईचे रडणे थांबायचे नावच घेत नव्हते.

"मला माहीत आहे, बेला ,खूप त्रास करुन घेऊ नकोस. अभ्यासावर लक्ष दे. आज तुझे आई-बाबा असते तर..."

"आई,थांब...please, ह्या विषयावर मला काहि हि बोलायच नाहि आहे." मी जवळ - जवळ तीच्यावर ओरडलेच , पण तिच्या चेहर्यावरची दुःखाची छटा पाहून, मला माझ्याच वागण्याचा रागआला.

"Sorry,I love you आई"म्हणत मी तीला मीठी मारली.

आईला निरोप देऊन मी माझ्या सीटवर येऊन बसले,काहि वेळाने ट्रेन ने वेग धरला आणि हळू हळू सर्व गोष्टी मागे जाऊ लागल्या. मीहया गावापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते  या लोकांपासून दूर, सर्वापासून दूर, माझ्या भुतकाळापासून दूर.ह्या गावाने माझ्यापासून सर्व हिरावून घेतल होत,माझं अस्तित्व, माझं घर, माझंआयुष्य आणि सर्वात म्हत्वाची व्यक्ती म्हणजे माझी आई...
गावात प्रत्येक जण माझा तिरस्कार करतो .पण का??  हे कोड मी आजवर सोडवु शकले नाहि.. मी खुप वेळा सरस्वतीला विचारण्याचा प्रयत्न केला पण तिने माझ्या प्रश्नाची उत्तर कधीच दिली नाहि..सरस्वतीने मला आपल्या पोटच्या गोळ्या प्रमाणे मला सांभाळले,गावाकर्याचां रोष स्वीकारुन तिने मला लहानचं मोठ केल, मला आईची माया दिली , आज ती नसती तर कदाचीत मी ह्या जगात नसते.तिच्याशिवाय माझं ह्या जगात आपलं अस कोणीच नाहि.
-------------------------------------------
मी मुंबईला पोहचले,रितिका ने माझ्या राहण्याची व्यस्था तिच्याएका फ्लॅट मध्ये केली होती..रितिका सरस्वतीच्या मैत्रिणची मुलगी..बिंधास्त,चंचल,फटकळ, दिसायला मोडॅल..शेवटी मुंबईची मुलगी. मी मुंबईबद्दल खुप ऐकल होत, सपनो की नगरीया and all....म्हणतात सर्वाची स्वप्ने पूर्ण होतात इथे..So बघुया माझ स्वप्नपूर्ण होते कि नाहि?

# 16 ए मी माझ्या रुम समोर उभी होते लॉकमध्ये चावी सरकवत मी दार उघडले आणि आत पाऊल ठेवले. घर तसे छान होते. हॉलमध्ये एक प्लाझमा टी.वी , टी.वी समोर  बसण्यासाठी एकब्लॅक लेदर काऊच, उजव्या बाजूला छोटासा काचेचा डायनींगटेबल, भिंतीवर छोट्या छोट्या फ्रेम्स.हॉल ला जोडुन एक किचन आणि एक आणखी रुम होती.
मी माझे सामान रुम मध्ये ठेवण्यासाठी आत शिरले. समोर एक बेड,बेडवर बिछान्यापेक्षा शर्टस आणि टी-शर्टस,टोवॅल च दिसत होते.बेडच्या मागे असलेल्या भिंतीवर काही फुटबॉल पोस्टर होते.डेस्क वर काहि पुस्तके,आजूबाजुला बियर cans  ,पिझ्झा box .रितिका ने मला ह्या बद्दल काहिच सांगितले नहव्ते.मी माझ्यासमोर असणारया कचार्याला पाहत होते आणि तेवढयात माझ्यामागे काहितरी हलाचाल झाली.

"शीटऽऽऽऽऽऽ" मी आणि समोरची व्यक्ती आम्ही एकत्रच ओरोडलो.माझ्यासमोर कंबरेला टॉवेल बांधुन मुलगा उभाहोता.त्याचे केस ओले होते.पाण्याचे थेंब त्याच्या शरीरा वरुन खाली पडत होते.मी पटकण मागे वळले.