*प्रेम ह्यांचं पण आहे माझ्यावर पण तसं नाही ...

Started by maheshs25, January 23, 2018, 08:33:40 PM

Previous topic - Next topic

maheshs25

आपल्या देशात अशी एक ना अनेक उदाहरण आहेत कि ज्यांना आपल प्रेम, जात ,पात , धर्माचा आड गाडून आयुष्याला समोरं  जाव लागत. अशाच माय बापाचा हट्टाखातर आपल्या प्रेमाची आहुती देऊन संसाराला लागलेल्या एक मुलीच मन आज मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न...

*प्रेम ह्यांचं पण आहे माझ्यावर
पण तसं नाही जसं तू करायचास माझ्यावर

ह्यांच्या प्रेमात थोडा हिशोब असतो
मी केलेल्या कष्टांचा
कदाचित तो मोबदला असतो
अन दिवसानुरूप तो घटत जातो

*प्रेम ह्यांचं पण आहे माझ्यावर
पण तसं नाही जसं तू करायचास माझ्यावर

मला तू आवडतेस म्हणून
तो मला रोज जवळ घेतो
घुस्मटते मी पण तो मात्र सुखावतो
शरीरावर होणारं प्रेम मनावर मात्र
खोलवर जखमा देतो
पाठमोऱ्या त्या देहाकडे बघून माझा देह
फक्त कोरडे अश्रू गाळतो

*प्रेम ह्यांचं पण आहे माझ्यावर
पण तसं नाही जसं तू करायचास माझ्यावर

स्पर्शानी तुझ्या पुलकित व्हायचे मी
आज ह्या स्पर्शानी कोमेजते मी
तू गिरवलेले अडीच अक्षरे
आजही सजवते पाठीवर मी
कारण
ती अक्षरे पुसणारे हात
छातीवरून परतताना रोज सोसते मी

*प्रेम ह्यांचं पण आहे माझ्यावर
पण तसं नाही जसं तू करायचास माझ्यावर

आता वाटतं ह्यालाच प्रेम म्हनावं
अन वेड्या मनाला समजवावं
पण शरीराची ऊब मनापर्यंत जात नाही
चिंब भिजते हे शरीर
पण मनाला पडलेली कोरड
काही भागात नाही ...

*प्रेम ह्यांचं पण आहे माझ्यावर
पण तसं नाही ...

majha kavitanchi link please click here https://goo.gl/7kaiXH

Satish Ramesh taral

मला माहित होत तु जानार आहेस म्हणून
आयुष्यातुन तरीही तुझ्यावर प्रेम केलं,.
तुझ्यासाठी जगलो पण माहित नाहि
आज सार काहि आयुष्यातुन गेलं,,
कारण आयुष्य ना खुप सुंदर आहे
अगदि तुझ्यासारखं...
पण तु शेवटी टाकून गेलि एकटा जिव
माघारी ते पण परक्या सारखं..
शेवटी काय बोल्लीस तु की मला
आता तु विसरुन जा..
अरे जातिय ना जा पण माझे तुझ्यासोबत
घातलेले प्रत्येक क्षण देउन जा...
..कविराज सतिष तराळ ..
मो.9527625684