स्वप्ने.......

Started by VIRENDRA, February 09, 2010, 11:13:01 AM

Previous topic - Next topic

VIRENDRA

स्वप्ने.........

           उकाड्याचा विसर पाडवा म्हणून नुकताच आलेला दैनिकाचा अंक हाती घेऊन उघडला , आणि मी वाचू लागलो. पहिल्या पानावरच्या राजकीय बातम्या नाक मुरडीत कशाबशा वाचल्या. चावून चोथा झाल्या होत्या त्या.काहीतरी अद्भुत, सनसनाटी  वाचायला मिळावा अशी माझी इच्छा होती.दैनिकाच्या दुसरया-तिसऱ्या  पानावर ती पूर्ण होईल म्हणून मी पान उलटले, माझी मंद दृष्टी इकडे-तिकडे फिरवली. पान त्या पानावर शब्द कुठेच आढलेनात ! जिथे शब्दांचा पत्ता नव्हता  तिथे रोमांचकारक बातम्या कुठून येणार? मी पुन्हा पान उलटले, त्यावरही नुसते आकडेच पसरले होते !!!!
            मी मनात गडबडून गेलो,कालपर्यंत शब्द कसेबसे दिसत होते. आपल्याला कष्टाने का होईना, ते  वाचता येत होते, आज तेही दिसेनासे झाले कि काय, या कल्पनेने माझे धाबे दणाणले...दृष्टी अधिक मंद झाल्यामुळे आपल्याला शब्द बारीक आकड्यासारखे भासत आहेत, असा मनात एऊन मी भयबित झालो.क्षणभर डोळ्यापुढे काळोख पसरला. दहा वर्षापूर्वी मोतीबिंदुमुळे दृष्टी मंद-मंद होऊ लागली तेव्हापासून अंधत्वाचा आपण मनापासून स्वीकार केला पाहिजे असे मी स्वताला बजावत आलो होतो. धृतराष्ट्र, मिल्टन, सूरदास वगैरेंची त्याला आठवण करून देत होतो. पान हे सारे बाल समोरील बारीक बारीक टिंबे पाहून कुठे गायब झाले कुणास ठावूक ! आपण लवकरच ठार आंधळे होणार या शंकेने माझा सारा धीर खचला....

            मात्र काही क्षणातच मी मी समाधानाचा सुस्कार सोडला, आज एस.एस.सी चा निकाल होता हे आठवतच माझा जीव भांड्यात पडला.समोरच्या पानावरचे आकडे हे यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुक्रमांक असावेत, या विचाराने माझ्या जीवात जीव आला.
पन त्या आकड्यात वाचायचे  काय ? घटकाभर स्वतचा विसर पडेल असे काहीतरी चटपटीत, खमंग वाचयला मला हवे होते.  त्या आकड्यांच्या  महापुरात सारया बातम्या वाहून गेल्या.
            काहीतरी चाळा हवा म्हणून मी आकड्यावरून नजर  फिरवू लागलो, समोर मुंग्यांच्या रांगाच - रांगा पसरल्या आहेत असा मला भास झाला. वृतपत्र अगदी डोळ्या जवळ आणले तेव्हा कुठे मला ते आकडे स्पष्ट दिसू लागले - ३४०८८,२५६८७,७३५६४ - एस.एस.सी ला यंदा दीड लाखावर विद्यार्थी बसले होते, त्यातल्या बावन्न टक्क्यांनी पोहून पैलतीर गाठला  होता, मग पानेच्या पाने त्या मुंग्या सारखे दिसणाऱ्या आकड्यांनी भरून गेली असतील तर नवल कसले....
            त्या आकड्याकडे बघत बघत मला मर्ढेकरांची ओळ आठवली...' हि एक मुंगी, ती एक मुंगी..' एरवी  अशा मुंग्या रांगेने जातात तेव्हा त्यांना काहीतरी सापडलेले असते, साखरेची गोनी,तांदळाचे पोते, निदान लाडवाचा डबा तरी ! पन या मानवी मुंग्यांना, योवनाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या मुला-मुलीना काय, आपले चिमणे पंख हलवीत आकाशशी गुजगोष्टी करायला निघालेल्या या पाखरांना  काय मिळणार आहे - भयानक महागाई, वाढती बेकारी, विशी- पंचविशीत येणारे वैफल्य- सारे सारे क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले! समोर पसरलेल्या त्या आकड्यांसाठी मन  हूर-हुरु लागले, त्या आकड्यांकडे मला पाहवेना. मी हातातले वृतपत्र दूर फेकून खिन्न मनाने  विचार करू  लागलो.........
           विचाराच्या तंद्रीत मन मागे मागे गेले, पंचावन्न पावसाळे मागे पडले, तेव्हा मी मैट्रिक च्या वर्गात शिकत होतो,बेळगाव केंद्रातून परीक्षा दिली होती, पापर बरे गेले होते. परीक्षेच्या निकालापर्यंत माझ्या मामाकडे मी राहिलो होतो, संध्या काळी फिरायला जायच्या रस्त्यावर कपिलेश्वराचे देऊळ लागत असे, त्या लहान वयात सुद्धा दगडातल्या देवावर मला विश्वास नव्हता! पन माझी पाऊले नकळत देवाकडे वळत, मी देवाला प्रदक्षिणा घालत असे,हाथ जोडून नमस्कार हि करत असे, पन तोंडाने त्याच्याजवळ काही मागत नसे, मी मनात म्हणत असे  "देवाला तर सारे काही कळते, मग आपल्या मनात काय आहे त्याला सांगायला कशाला हवे ?"
निकालापुर्वीचे ते अकारण  अस्वस्थ दिवस माझ्या डोळ्या पुढे उभे राहिले, निकाल जवळ आला म्हणून एखादे दिवस छातीत धड-धड सुरु होई.मात्र पुढच्याच क्षणी मनात अनेक स्वप्ने फुलपाखरासारखी भिर-भिरत. कदाचित आपला नंबर खूप वर येईल, मग आपल्याला एखादी शिष्यवृत्ती मिळेल, ती मिळाली कि कॉलेजात जायची संधीही........

mahesh raut


सतिश

फारच सुंदर सर..  तुमच्या लिखाणाचा ओघ अतिशय छान आहे... आणखी लिहत राहा..