स्वप्ने......... (पुढे चालू..)

Started by VIRENDRA, February 09, 2010, 12:27:17 PM

Previous topic - Next topic

VIRENDRA

स्वप्ने.........

(पुढे चालू..)

  .........पुढे आपण संस्कृतचे नाहीतर इंग्रजीचे प्रोफेसर होऊ, जाड-जुड पुस्तके लिहू - हे स्वप्ना विरले म्हणजे वाटे, आपला नंबर वर नाही आला तर ? लगेच दुसरया स्वप्नाचा चित्रपट सुरु होई,आपल्याला कॉलेजात जायला नाही मिळाले तर काही बिगडत नाही, आपल्याला घरच्यांनी पोस्टात चीटकावायचे  ठरवलेच आहे, पोष्टातली नोकरी वाईट थोडीच असते? गेल्या वर्षी कागलच्या मामा कडे गेलावर त्याच्या जागी बसून आपण कार्डे-पाकिटे विकली आहेतच  कि, आपण प्रोफेसर झालो काय, पोस्टमास्तर झालो तरी आज न उद्या आपण नाटके लिहिणारच आहोत कि.. देवल-खाडीलकरांच्या सांगलीत आपला जन्म झाला आहे तेव्हा आपण नाटके खास लिहू शकतो.ठरलं तर उद्याच आपण अनिरुद्धची प्रेम कथा लिहायला घ्यायची.. आपण तर नाटकाचे नाव हि ठरवून ठेवले आहे....- " स्वप्नं- संगम".
          पंचावन्न वर्ष्या पूर्वीच्या माझ्या या स्वप्नातले अक्षरही खरे झाले नाही, मी प्रोफेसर झालो नाही ना पोस्टमास्तर, नाटककार हि झालो नाही, पन याच स्वप्नांनी मला किती आधार दिला होता,भावी जीवना बाबत माझ्या मनात किती उत्साह निर्माण केला होता...
      दूर फेकून दिलेला दैनिकाचा अंक मी  हळुवारपणे  हातात घेतला, त्या वरील विद्यार्थांच्या अनुक्रमान्कावरून मी आपुलकीने दृष्टी फिरवू लागलो.
       छे! मुंग्यांसारखे दिसणारे ते आकडे राहिले नव्हते! शून्यातून सृष्टी निर्माण व्हावी तसे त्या आकड्यातून तरुण मुला-मुलींचे कितीतरी चेहरे - काळे-गोरे, हसरे-गंभीर प्रकट होऊ लागले, मूकपणे माझ्याशी बोलू लागले....
६३५२६-२३९९६-१४८६८-१५६८९
      छे ! यांना आकडे कोण म्हणेल ? हिरव्यागार पानाअडून डोकावून पाहणाऱ्या अर्धस्फुट कळ्या होत्या त्या..विद्वत्तेची, वैभवाची,देशभक्तीची,समाज सेवेची, कौंटुंबिक  कर्तव्यांची आणि असाच प्रकारची कितीतरी सोनेरी स्वप्ने उराशी बाळगून अज्ञात भविष्याचा शोध घ्यायला निघालेले हे सारे छोटे कोलंबस होते.
        २३१५२ - हा काय पाच आकड्यांचा समुदाय आहे...अहं ! या अक्ड्यामागे एक उंच,कृश, मध्यम गौर मुलीचा हसरा चेहरा माझ्याकडे टक लावून पाहत आहे. तिचे ते काळेभोर मोठे डोळे! या डोळ्यांनी जगातील सारे सौन्दर्य, सारे आनंद प्यायला ती किती आतुर झाली आहे ? हे डोळे मला म्हणता आहेत " मी कविता करते आहे हे तुम्हाला ठावूक आहे काय ?- माझा हे गुपित कुणाला आत्ताच सांगायचा नाही बरं का - मी खूप मोठी कवियित्री  होणार आहे...."
      हा दुसरा क्रमांक,आकडे नीट दिसत नाहीत, पन आकड्यांशी काय करायचं ?   धुके विरळ झाले म्हणजे समोरील दृश्य स्पष्ट दिसू लागते.. हा काय  सावळा, निबर चेहऱ्याचा मुलगा- पन त्याच्या चेहऱ्यावरील स्मित, काळ्या    ढगा अडून चमकणाऱ्या विजेसारखे...हा मुलगा म्हणतोय." माझ्या आई नि खूप काबाडकष्ट करून मला शिकवलं, मी सत्तर टक्यांनी पास झालो, मी आई ला हे सांगितलं तेव्हा ती जेवत होती, आनंदानं तिच्या घश्या खाली घास उतरेना ! आता मी खूप शिकणार, चांगली नोकरी मिळवून म्हातारपणी आईला सुखात ठेवणार..."


                                                   (पुढे चालू..)