आरसा

Started by sanjweli, February 19, 2018, 05:05:08 PM

Previous topic - Next topic

sanjweli

आहेस तू दुर कोठे,ते मला का माहीत नाही,
ढळला अश्रु आता, तो ही माझा उरला नाही,

शोधले खुप परी,काहीच गवसले नाही,
उरले न् मन माझे,बघ आता मीच माझा उरलो नाही,

आहेस मनमोहिनी अजुन तू ,या दिलाच्या अंतरी,
गजल बघ आपल्या प्रीतीची,अजुन पुरी झालीच नाही,

थांबलोय जरासा,ओळख मी विसरत नाही फारसा,
सांग उगीच का ते बहाणे,बिंब आपले सोडतो का कधी आरसा,

सुख दु:ख भाग जीवनाचा,भोग येथे कुणा चुकला आहे,,हातातला हात सुटला तरी,तू माझ्या रोमारोमात जीवंत आहे,

गोडगोजीरी बाहुली आता,आपली ओळख आहे,
डाव मांडला नवीन जरी, एकसारखा तुझा भास होत आहे,

संसार आपला तोच आहे,बहरला पुन्हा गुलमोहर आहे,
रंगरुप चेहरा वेगळा,तुझी ती सावली  दुसरे प्रतिरुप आहे.

©महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४०५३८२१४३
©sanjweli