राजकारणी सल्ला

Started by Asu@16, February 26, 2018, 04:55:38 PM

Previous topic - Next topic

Asu@16

राजकारणी सल्ला

राजकारण्यांच्या छत्राखाली
शस्त्र साहित्यिकांचे म्यान झाले
शस्त्र जे आम्हां उगारायचे
तेच आमचे मिंधे झाले
सर्वज्ञ झाले सत्ताधारी
भाष्य करण्या बुद्धिमत्ता भारी
सर्व विषयात आमची भरारी
जाब विचारता चुकून कुणी
पुढे माध्यमांची सादर पिकदाणी
शब्द थुंकून पेरावी साखर
बिनधास्त फोडावे माध्यमांवर खापर
राजकारणी आखाडा, फक्त आमुचा
शक्तिपात का करता तुमचा
मोडाल दंड, ठोकू नका
फालतू भाष्य करू नका
जिवंत मरणे मरू नका
आव्हान न देण्या तुमचे हित
नाही तर व्हाल चारी मुंड्या चीत
कर्म तुमचे करीत रहा
खेळ आमुचा दुरून पहा
सल्ला ऐका, तुमचेच हित
नाहीतरी ठरली आमचीच जीत

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita