प्रीत माझी....कर्म माझे

Started by Suhas Phanse, February 11, 2010, 10:41:20 AM

Previous topic - Next topic

Suhas Phanse

मराठी गज़ल
प्रीत माझी....कर्म माझे :'(
(याच्या चालीसाठी येथे क्लिक करा.)[http://www.youtube.com/watch?v=kM9CNO9ZYlw]

प्रीत माझी सप्तरंगी , उजळून टाकी आसमंता
कर्म माझे आंधळे, दीपवू त्याला कसे ?

प्रीत माझी सप्तसूरी, नीनादते या आसमंता
कर्म माझे ठार बहिरे, मी ऐकवू त्याला कसे ?

प्रीत माझी अष्टगंधी, दरवळे या आसमंता
कर्म निश्वासी असे, मी माखवू त्याला कसे ?

प्रीत माझी मखमली ती,  कुरवाळते या आसमंता
कर्म माझे कंटकाचे, कुरवाळू मी त्याला कसे ?

प्रीत माझी दानशील, सर्व लुटते आसमंता
कर्म माझे कृपण आहे, देण्यास सांगू त्याला कसे ?

प्रीत माझी भावदर्शी, भारते या आसमंता
कर्म माझे स्थितप्रज्ञ, भारवू त्याला कसे ?

प्रीत माझी क्रियाशील, हलवून टाकी आसमंता
कर्म माझे क्रियाहीन, काम त्याला सांगू कसे ?