हरून जिंकलो मी (गझल)

Started by Asu@16, March 14, 2018, 08:48:36 PM

Previous topic - Next topic

Asu@16

गझल सम्राट स्वर्गीय सुरेश भट यांच्या स्मृतीला वंदन करून आज माझी पहिली गझल सादर करतो.

हरून जिंकलो मी (गझल)


प्रेम करून फसलो मी
मज विसरून बसलो मी

बंदी करून स्वतःला
वेड्यापरी हसलो मी

स्वच्छंद नभात उडता
पिंजऱ्यात शिरलो मी

तृषार्त होवून सजणी
हृदयी तुझ्या वसलो मी

हरून सर्वस्व माझे
प्रेमात जग जिंकलो मी

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita