स्मशान

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 15, 2018, 11:50:13 AM

Previous topic - Next topic
*शिर्षक.स्मशान*

मनाचे दुःख सारे स्मशान झाले
स्वप्न सुखाचे सारे स्मशान झाले

उगाच नाही जोडले शब्दाशी नाते
जे रक्तातले होते सारे स्मशान झाले

आड अंगणी माझ्या तहान भागवाया
दुष्काळी मनाचे रान सारे स्मशान झाले

सुकलेल्या ओठांवर गीत तुझेचं होते
चिंब भिजवणारे बोल सारे स्मशान झाले

जाळून टाक संस्कारी रूढी परंपरा आता
होते संस्कारी मन सारे स्मशान झाले

चंद्रकोर भाळी असली जरी माझ्या
भाळावरचे भाग्य सारे स्मशान झाले

वाहून जाऊ ओघात प्रेमाच्या पण
तुजवरचे हक्क होते सारे स्मशान झाले

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

तुमच्या मनातला विरह कवी