वेदना

Started by gulmohar, March 15, 2018, 01:56:35 PM

Previous topic - Next topic

gulmohar

तुझे घर येता, रस्ताही जातो वळून.
खिडकीतला तुझा हुंदका सांगतो जा सगळे विसरून .

रस्तावर पुढे चालता चालता मन मात्र मागे मागे जाते.
खोट्या आशेशी, मनाचे असते, अनामिक अदृश्य नाते.

मी संपेन, पण हा रस्ता, हा प्रवास, नाही संपणार.
कुणीतरी अनोळखी, माझी वेदना अनुभवत ह्या रस्त्यावर कायम चालणार.