आशा

Started by gaonkarsach, March 16, 2018, 09:17:42 AM

Previous topic - Next topic

gaonkarsach

अथांग महासागराच्या त्या निर्मनुष्य वस्तीत,
कसे ते कमलदल फुलुनी यावे?

माझी मात्र हीच भाबडी आशा... की तुझे न माझे गीत जुळुनी यावे...

घनदाट जंगलाच्या त्या राक्षशी बाहुपाशात,
कसे ते कांचनमृग जन्मास यावे?

माझी मात्र हीच भाबडी आशा... की तुझे न माझे गीत जुळुनी यावे...

रुक्ष वाळवंटाच्या त्या रणरणत्या उन्हात,
कसे ते निवडुंग जगावे?

माझी मात्र हीच भाबडी आशा... की तुझे न माझे गीत जुळुनी यावे...

गीत जुळुनी यावे, मीत मिळूनी यावे,
प्रपंचाच्या त्या वेदनादायक अस्तित्वाची रीत कळूनी यावे.

मेघावाचून त्या नभामधील पाणी कसे काय झरावे?
सांग प्रिये... तुझ्यावाचून मी कसे काय बहारावे?

मधुर स्वप्नांना त्या पालवी फुटूनी...
संसार सुरू जाहला...

चांदन - मोती सगळेच विखरुनी...
फक्त धागा शिल्लक राहिला...

विखुरलेल्या त्या स्वप्नांनी प्रिये,
जणू आपल्याला साद घालू पाहावे...

आणि त्यांचीही जणू हीच भाबडी आशा...
की तुझे अन माझे गीत जुळूनी यावे...

गीत जुळूनी यावे, मीत मिळूनी यावे,
प्रीतीच्या ह्या मस्त फुलांनी... एकजीव होऊनी जावे!

- सचिन गांवकर (My unexpressed feelings)

https://www.facebook.com/photo.php?fbid=939984266097466&set=pb.100002577053155.-2207520000.1521616208.&type=3&theater


Parshuram Mahanor


gaonkarsach



gaonkarsach

Thanks so much Dalavi ma'm! :)

TkGhoul

जानकारी के लिए धन्यवाद