लिहूया म्हणतो

Started by शिवाजी सांगळे, March 23, 2018, 09:59:32 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

लिहूया म्हणतो

दु:खाला आता जरा वेठीस धरूया म्हणतो
एखादी कविता दु:खावरती लिहूया म्हणतो

धुंडाळली अनेक गावे सुखाची काल परवा
उरली भेट दु:खाच्या गावा देवूया म्हणतो

आनंदाची, सुखाची गायलीत अनेक गीते
शेवटी सुर एक दु:खाचा आळवूया म्हणतो

स्मृती येथे चिरंतन प्रेमाच्या बांधल्या कुणी
स्मारके अज्ञात शहीदांची स्मरूया म्हणतो

वाजत गाजत येताच वरात दु:खाची दारी
अंतिम यात्रा सुखाची डोळी पाहूया म्हणतो

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९