डाव फसला

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 23, 2018, 11:22:34 AM

Previous topic - Next topic
*शिर्षक.डाव फसला*

भेटतांना भेटल्याचा
डाव कसा फसला
पाहता पाहता सये
चेहरा तुझा का रुसला

छेडलेल्या मधुर गीताचा
ताल मधेच थकला
ठेका तुझ्या प्रेमाचा
लयीत न येता चुकला

मृदुंगाच्या तालावर सये
नाचतांना पाय कसा रुतला
गजल लयीत होती पण
चुकला एक शेर एक मतला

दिवाना सौंदर्याचा झालो
अन संसार मनात सुचला
रोज जाऊनी मग मंदिरात
खोटा संसार मी रचला

सगळं होतं सुरळीत सये
अर्थ होता पूर्ण तरी का संपला
भाव होता मनी सोबत जगण्याचा
पण तुझा मजवरचा विश्वास खचला


✍🏻(कवी.अमोल शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

तुमच्या मनातला विरह कवी