देरानिनं गऱ्हानं

Started by Asu@16, March 28, 2018, 06:32:28 PM

Previous topic - Next topic

Asu@16

जुन्या काळातील एकत्र कुटुंबपध्दतीतील देराणीचं गाऱ्हाणं ...

देरानिनं गऱ्हानं

खेतीबाडी घरदार
जेठजिना नामना
सालदार बनिसन कसा
खेतमां खपी ऱ्हायना

घरमास्नी सारी सत्ता
जेठानिना हातमा
बैल बनिसन कसा
घरमा राबी ऱ्हायना

जेठले रोज जेवाले 
शिरापुरी ताटमा
कांदाभाकर खाईसन कसा
निया पडी ऱ्हायना

लगीन करिसन रात
ढोरायच्या साथमा
ढोर बनिसन कसा
खयात जपी ऱ्हायना

गावमा कोनी ईचारिना
घरका ना घाटना
कुत्रा बनिसन कसा
गोंडा घोई ऱ्हायना

दुख सांगू कोनले
दादला मारस रातले
कानोडं मन येडं कसं
सांग्या बिगर राह्यना

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita