कळलेच नाही

Started by Monica, March 28, 2018, 10:49:58 PM

Previous topic - Next topic

Monica

कळलेच नाही

आईच्या कुशीत लप्त्ता लप्त्ता
कसे मोठे झालो कळलेच नाही
सावरताना घट्ट धरलेले तिचे बोट
कधी सैल पडले, कळलेच नाही.....

आई जवळ यावी म्हणून
मुद्दाम आणलेले अश्रू
आज तिच्याच पासून
कधी लपवले, कळलेच नाही.....

बोबडे होते बोल तेव्हा
बोलायचे होते खूप काही
आज स्पष्ट बोलत असता
का बोललो नाही, कळलेच नाही.....

दुध भात भरावतांना
घास करायचीस चिमण्यांचा
त्या चिमण्यांचा थवा
कधी उडाला, कळलेच नाही.....

तुझ्या काजळाचा टीळा लाऊन
" बाळा दृष्ट न लागो " म्हणायचीस
आज खरच दृष्ट लागत असता
काजळाचा टीळा कुठे गेला, कळलेच नाही.....

उन्हात असता पदर द्यायचीस डोक्यावर
आज उन्हाच्या झळा सोशात असता
पदर कुठे हरवला, कळलेच नाही....

अंधारात घट्ट धरायचीस जवळ
दिसत नसता काही, तुझा स्पर्श धीर द्यायचा
आज चाहु कडे अंधार आहे ग !
पण तुझा स्पर्श कुठे गेला , कळलेच नाही.....

" बाळा खूप मोठा हो " असा आशीर्वाद द्यायचीस
आज झालो ग आम्ही मोठे
पण हे मोठेपण तुझ्याच पासून दूर नेयील
हे कळलेच नाही......

- मोनिका जामकर नांदापूरकर
मोनिका जामकर नांदापूरकर

Deokumar


Monica

मोनिका जामकर नांदापूरकर

sudhir taru


sudhir taru