कधीतरी ते दोन क्षण पुन्हा यावे

Started by Monica, March 29, 2018, 01:22:48 PM

Previous topic - Next topic

Monica

भाताचा घास घेत मागे मागे यावे
"किती त्रास देता मला " असे काही म्हणावे
स्वच्छ स्वच्छ अंघोळ घालून तयार तू करावे
कधीतरी ते दोन क्षण पुन्हा यावे.....

परीच्या त्या छान छान गोष्टी तू सांगावे
पुन्हा त्या बंड बागलबुवाची भीती काही दाखवावे
भीतीने रडणाऱ्या आम्हाला जवळ तू घ्यावे
कधीतरी ते दोन क्षण पुन्हा यावे.....

शक्तिशाली वीर राजाची कथा काही रचावे
तर कधी नाजूक शब्दांचे गीत तू गावे
तू बनवलेल्या गोष्टीही मग खर्या खुर्या भासावे
कधीतरी ते दोन क्षण पुन्हा यावे.....

खोडी कधी केली म्हणून चार झपके तू द्यावे
रडत रडत झोपल्यावर हळूच डोक्यावरून हात तू फिरवावे
" उगाच बोलले मी " असे मनातच म्हणावे
कधीतरी ते दोन क्षण पुन्हा यावे.....

थकून भागून बाबा थोडे लवकर घरी यावे
" काय खोडी केली आज ?" भुवया उंचावून विचारावे
घाबरलेलो मी हळूच आई कडे बघावे
कधीतरी ते दोन क्षण पुन्हा यावे.....

मस्ती करतो सारखा थोडे बाबांना कळवावे
बाबांनीही मग हळूच गमतीने रागवावे
आले डोळ्यात पाणी की आईने जवळ यावे
कधीतरी ते दोन क्षण पुन्हा यावे.....

खाऊ नाही आज बाबांनी हात मागे घ्यावे
मीही मग तिथेच रुसून बसावे
बाबांनी मग चटकन आईस क्रिम ते द्यावे
कधीतरी ते दोन क्षण पुन्हा यावे.....

आकाशात पुन्हा तो चांदोमामा यावा
गमतीने मग त्याने ढगात थोडे लपावे
आई बाबा आणि मी पुन्हा त्याला शोधावे
कधीतरी ते दोन क्षण पुन्हा यावे.....

आईने रोज रात्री मारून अभ्यासाला बसवावे
अर्ध पाण लिहून मी गुपचूप पळून जावे
बाबांच्या खांद्यावर बसून पूर्ण गाव मिरवावे
कधीतरी ते दोन क्षण पुन्हा यावे.....

बाबांनी तार्यांचे आकार काही सांगावे
मीही मग त्यात स्पायडरमॅनला शोधावे
आई बाबांचे बोट धरून शांतपणे झोपावे
कधीतरी ते दोन क्षण पुन्हा यावे.....

- मोनिका जामकर नांदापूरकर
मोनिका जामकर नांदापूरकर