उसंत घे तू आता क्षणभर..!!

Started by श्री. प्रकाश साळवी, April 02, 2018, 02:56:52 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

उसंत घे तू आता क्षणभर..!!

उसंत घे तू आता क्षणभर
या सुखांनो आता क्षणभर
**
कुणी पहिले मरण उद्याचे
जगून घे तू आता क्षणभर
**
अवती भवती जग मोहाचे
विचार कर तू आता क्षणभर
**
निजलास सुखाने तू सरणावर
सुटका करून घे तू आता क्षणभर
**
कष्टलासी रे तू दिवसभर
नाम घे रे प्रभूचे आता क्षणभर
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
०१-०४-२०१८

Atul Kaviraje

     प्रकाश सर, " उसंत घे तू आता क्षणभर" या आपल्या दार्शनिक कवितेत, आपण जीवनाची, एकंदर हयात-भराची व्याख्या नमूद केली आहे, असं मला वाटतं. कवी या कवितेत म्हणतोय, पुढे तुला खूप जगायचंय, खूप काही पाहायचंय, अनुभव घ्यायचाय, खूप कष्ट घ्यायचेत. पण हे सारं तुझ्या अनुभवास येण्यापूर्वी तू क्षणभर तरी उसंत घे, विश्रांत घे, विश्राम घे, तुला स्वतःला वेळ दे.

     आपल्या सर्व कडव्यांतून शेवटी आपली गाडी ही 'क्षणभर" या स्थानकावर येऊन थांबते. खरं आहे. सुख-दुःख , जीवन-मरण, मोहाचे क्षण, सरण , प्रभू - नाम, इत्यादी समर्पक शब्दांचा, विशेषणांचा आपण या लघु-कवितेत योग्य त्या ठिकाणी चपखलपणे  वापर केला आहे. कविता छान वाटली, आवडली. अश्याच सुंदर, अर्थपूर्ण सोप्या भाषेतल्या कविता रचत जा. आपणास माझ्या शुभेच्छा.

     हे जीवन आहे क्षण-भंगुर
     ते आताच जगून घ्या
     पुढचे कोणास ज्ञात आहे,
     इथेच क्षणभर विश्रांती घ्या.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-०७.०६.२०२१-सोमवार.