आम्ही दिवे विझवत नाही !!

Started by श्री. प्रकाश साळवी, April 03, 2018, 03:29:58 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

आम्ही दिवे विझवत नाही !!

मी कोणाला हिणवत नाही
आम्ही दिवे विझवत नाही.
**
करा वाढदिवस साजरे
औक्षणाला विसरत नाही
**
किती पिशील तू नशेला
ढोसण्या ते सरबत नाही
**
गेला सोडून जरी मला रे
तुझ्याविना मज करमत नाही
**
ज्योतीने आम्ही प्रेम वाटतो
अंधाराला कोणी जमवत नाही
**
नका म्हणू हो कवी आम्हाला
कवने दुसऱ्याची पळवत नाही
**
कधी ना चिंतितो अहित दुसऱ्याचे
भले कराया आम्ही शरमत नाही
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
०२-०४-२०१८