चिंता

Started by Deokumar, April 06, 2018, 09:44:30 AM

Previous topic - Next topic

Deokumar

चिंता

का चिंतीत झाले मन हे
का वादळ सुटले मनात हे
झोंबतोय मनाला हा थंड वारा
उठती साऱ्या अंगावरती शहारा

मनामधी पेटला हा वणवा
राहिल्यात कोणत्या उणिवा
जळतोय एकटाच मी हा अंतरी
जाईल कशी ही चिंता दुरी

उठती मनामधी बेभान होऊन लाटा
हरविल्यात कोठे ह्या वाटा
आले भरुन चिंतेचे नभ
झाले बावरे मन वाढता चिंतेचा वेग

का कुणास ठाऊक
कशी आली ही निराशा
होतेय मनाची तडफड
जसा जाळ्यात अडकतोय मासा
                   :-देवकुमार
              सुभानपुर, बुलढाणा
https://dattagumatkar.blogspot.in