सांगणा गं सखे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 19, 2018, 04:46:16 AM

Previous topic - Next topic
*शीर्षक. सांगणा गं सखे*

धागा बांधला प्रेमाचा सारं गाव रुसलं
सांगणा गं सखे यात माझं काय चुकलं

वेगळीच दुनिया होती ती
मी तुझा तू माझी होती
आकाश सोबत द्यायचं
पंखा खाली झाकून घ्यायचं

नजर लागली अशी प्रेमाचं झाड सुकलं
सांगणा गं सखे यात माझं काय चुकलं

लपून छपून भेटायचो
कधी तरी गुज गोष्टी करायचो
लांब सडक केसांच्या सावलीत
दिवस असाच घालायचो

नकळत प्रेम झालेलं अस का तू झाकलं
सांगणा गं सखे यात माझं काय चुकलं

केसांचा सुगंध तुझ्या
मनाला भुरळ पाडायचा
जीव कासावीस होऊनी
तुझ्या मांडी वरती निजायचा

नाते सावरताना सखे का बाजूला टाकलं
सांगणा गं सखे यात माझं काय चुकलं

गुलाबाचं फुल द्यायची ना तू
त्या गुलाबावर माझं नाव असायचं
जमिनीवर अंथरलेल्या पकळ्यांवर
दोघांचं सुंदर नाव लिहलेल दिसायचं

माझ्या कोमल हृदयावर नाव तुझं कोरलं
सांगणा गं सखे यात माझं काय चुकलं

जीवन जगतांना हृदयाच्या
कुलपाला चावी लावायचं राहून गेलं
हृदयाच्या पिंजऱ्यात अडकलेलं
पाखरू हातावर तुरी देऊन उडून गेलं

माझ्या प्रेमाला तू शेवटी एकट सोडलं
सांगणा गं सखे यात माझं काय चुकलं


✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

*तुमच्या मनातला विरह कवी*