'अर्थ डे'( जागतिक वसुंधरा दिवस)

Started by कदम, April 22, 2018, 10:19:49 PM

Previous topic - Next topic

कदम


देवु आपण ध्यान ईकडे
टाळु प्रदुषण थोडे-थोडे
सुटेल संपन्नतेचे कोडे
लावु आपण सर्वञ झाडे

होते आहे आजकाल वागणे
निसर्ग ऋतुंचे वेडे-वाकडे
जतन करूया आपल्या पृथ्वीचे
दिवस आहे आज 'अर्थ डे'

खनिजसंपत्तीसाठी नाही
करणार जमीनीचे तुकडे
जतन करूया वने,पहाडे
दिवस आहे आज 'अर्थ डे'

नसेल जंगल वने-वनराई
पडतील सरोवर कोरडे
लावुया जगवुया रोपटे
दिवस आहे आज 'अर्थ डे'

जतन करूया जलसाठे
होऊ नये पाणी महागडे
टाळु प्रदुषण पाण्याचे
दिवस आहे आज 'अर्थ डे'

करू एकच दृढ निश्चिय
लावु झाडे जगवु झाडे
टाळु पृथ्वीवरील प्रलय
दिवस आहे आज 'अर्थ डे'
              ***