मनभरून पहायचं व्हतं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 23, 2018, 07:01:08 AM

Previous topic - Next topic
*शीर्षक.मनभरून पहायचं व्हतं*

तुला पाहण्यासाठी मन माझं खूप झुरतं
बस्स तुला सये मनभरून पहायचं व्हतं

तुझ्या ओठांच्या स्पर्शात
रिमझिम पावसाची होते
सारे अंग अंग शहारून
मनाची बाजू कोरडी राहते

टिपटिप थेंबात मग चित्र तुझं दिसतं
बस्स तुला सये मनभरून पहायचं व्हतं

ओढणी वाऱ्यावर उडते
तस मन विखरल्या जाते
एक एक कण मग तुला आठवतो
अन तू पुन्हा समोर येते

विस्तवाच्या आचेवर मन चालतं जातं
बस्स तुला सये मनभरून पहायचं व्हतं

चटके पायाला लागत होते
मनाला मात्र आतून जाळत होते
आग होते मग जळणाऱ्या मनाची
हे तर तुला नकळून कळत होते

तुटलेल्यांं मनात अश्रूचं सारं रान फुलतं
बस्स तुला सये मनभरून पहायचं व्हतं

नको येऊस माझ्या वाटेला
दुरूनच मनाला शांत करतो
धडधड होईल जोरात जेव्हा
तुझ्या फोटोचा आधार घेतो

फोटो पाहुनचं मन सारं समजून घेतं
बस्स तुला सये मनभरून पहायचं व्हतं


✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर