काळ्याभोर मातीमंदी चालली होती कुस्ती

Started by siddheshwar vilas patankar, April 26, 2018, 04:57:03 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

काळ्याभोर मातीमंदी चालली होती कुस्ती

ढुश्यावरती ढुशी मारत बसल्या व्हत्या म्हशी

आधीच काळ्या कोळश्यावानी , त्यात मातीपण ती काळी

कोण दुभती? कोण पोटुशी ? उमजेनाशी झाली

पिलं सारी हंबरती

शोधण्यास आपली माय

मस्त मौज त्या करिती साऱ्या

रोवूनी मातीत पाय

संधिवात तो दाटता

आठवते परतीची ती वाट

जड मनाने निघती तेथुनि

पिले घेऊनि मुकाट


सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C