कविता: का...!

Started by Rajesh khakre, May 09, 2018, 06:56:12 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre


कविता:

तुझ्या आठवात सांग कितीदा मी भिजावे
बोलू लागता काही शब्दांनी का थिजावे

गंधाळल्या स्मृतींचा मांडुनिया पसारा
गुंतून जावे किंवा कितीदा अलग व्हावे

विश्वास देऊनी तो पुन्हा कधी न आला
जिव्हेस दोष द्यावा कि घाती त्यास म्हणावे

प्रत्येक घटनेचा नको मोर्चा-चर्चा आता
तोडण्या वृत्तीची नांगी माणसाने शिकावे

भगव्या आणि हिरव्यात काल वाद झाला
एकाच गुलमोहरात आम्ही का रंग भरावे?

धर्माची ठेकेदारी खूप स्वस्त झाली हल्ली
माणुसकीने तरी का इतके दरिद्री बनावे

गरिबी दूर करण्या काल दोन पार्ट्या आल्या
हेतू एकच असता त्यांनी अलग का लढावे?

लिहिण्या बोलण्याला शब्दच देती सहारा
मनावरती शब्दांनीच ओरखडे का काढावे?
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४