हृदयाचा बंद दरवाजा

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 11, 2018, 06:50:08 AM

Previous topic - Next topic
*शीर्षक.हृदयाचा बंद दरवाजा*

सये गाली जरा काजळ लावत जा
हृदयाच्या बंद दरवाजात दीप लावत जा

रोज वाया जाते गं
शर्टावरच अत्तर हे
पतंग जातो उंच उंच
का तुटते मधेच सुत्तर हे

मनातलं थोडं तरी कोणापाशी सांगत जा
हृदयाच्या बंद दरवाजात दीप लावत जा

तुझ्या घराच्या अंतरात
डोकावून मी पाहतो
पाहून तू मजला गं
सांगशील तू मनात राहतो

थोडंस आपल्यातलं लपवून ठेवत जा
हृदयाच्या बंद दरवाजात दीप लावत जा

तुझ्या हातानं बनवलेल्या
चहाची मला इच्छा नाही
तू मला पाहून जाशील
त्यात काय मज्जा नाही

मेहंदी रंगणार नाही त्यात प्रेम भरत जा
हृदयाच्या बंद दरवाजात दीप लावत जा

काय होईल गं थोडीशी
तू माघार ही घेतल्यावर
येशील ना तू पुन्हा संभाळण्या
थोडासा मी पण सांडल्यावर

असं होणार नाही थोडा प्रयत्न करत जा
हृदयाच्या बंद दरवाजात दीप लावत जा

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर