माझे शहर पेटलेले आहे

Started by Rajesh khakre, May 16, 2018, 12:39:32 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

माझे शहर पेटलेले आहे
●●●
जाती-धर्मात वाटलेले आहे
माझे शहर पेटलेले आहे

अडाणी समजू नका त्यांना
सारे लोक शिकलेले आहे

जनावरांची भीती कसली
माणसालाच भ्यायलेले आहे

अफवा लगेच पेट घेते आता
डोके सगळे भडकलेले आहे

जो तो संशयानेच बघतो
मनं एवढे गढूळलेले आहे

दोन रंगाच्या भांडणामध्ये
रक्त लाल सांडलेले आहे
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com