मैत्र

Started by indradhanu, February 13, 2010, 12:33:34 AM

Previous topic - Next topic

indradhanu

या धकाधकीच्या जीवनात हवेत सुखाचे चार निवांत क्षण
आणि एक मित्र हवा ज्याच्याजवळ मोकळे करावे मन
दुनियेच्या रंगमंचावर कोट्यावधी बहुरूपी चेहरे
बुद्धिबळाच्या पटावरचे जणू सारे कारस्थानी मोहरे
कपाटाच्या दलदलीत मी खोल रुततो आहे
पण दूरवरच्या प्रारब्धात दिव्या टिंब दिसतो आहे
बहुरुप्यांच्या जगात  या अस्सल चेहरा मिळेल का?
मिळाला तरी जिवाभावाचा मैत्र तयाशी जुळेल का?
माहित आहे घोडचूक मी पुन्हा करतो आहे
पण उरलेली सहनशक्ती आता पणाला  लावतो आहे
रक्ताळलेल्या या हृदयाला मायेची पाखर मिळेल का?
मैत्रीच्या रेशमी वस्त्राने जखमा कुणी पुसेल का?
दुसरे काही नको आहे... मला हवी आहे फक्त साथ
कायमचा निरोप घेताना...हातात घ्यायला एका खऱ्या मित्राचा हात.