बदल

Started by शिवाजी सांगळे, May 22, 2018, 01:36:11 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बदल

जगण्या कर्जा सह हप्त्यांचे लॉक आले
धुळवाटा गेल्या त्या प्लेव्हरब्लॉक आले

ठिसूळ झाली घरे विटांनी बांधलेली
ईमारतीत उंचच सिमेंट ब्लॉक आले

वितळता भट्टीत जेव्हा कडी कोयंडे
दारी कसले कसले आता लॉक आले

अडगळच आता झाले घड्याळ चावीचे
हाताला हल्लीचे डिजिटल क्लॉक आले

पाखरे तर झाली कमी शहरात आता
मानवनिर्मित विमानांचेच फ्लाँक आले

© श्री शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
[/left][/left][/left]
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९