ती वेळच वेडी होती

Started by amoul, February 13, 2010, 10:55:46 AM

Previous topic - Next topic

amoul

ती वेळच वेडी होती, ती वेळच खुळी होती,
मी पाहिलं जेव्हा तिला तिच्या गालावर खळी होती.

लाडिक ओठांच्या कोरीत नाजूकच ते हसणे होते,
डोळ्यात फुललेले तेज, पण नजरेत लाजेची जाळी होती.

काजव्याने काय करावी चमकण्याची चांदनिशी स्पर्धा,
चमकून हसण्याची अदाच तर खरी लाडिकवाळी होती.

कित्येक वेडे येथे या पूर्वीही झाले होते,
नेमकी याचवेळी माझीच पाळी होती.

चांदणं फुललं होतं डोळ्यात तिच्याही तेव्हा,
आनंदात न्हाली मनातली प्रत्येक आळी होती.

तिच्या शब्दांची झेलून भिक्षा कितीजण समर्थ ठरले ?,
उपेक्षेची रेष केवळ कित्येकांच्या कपाळी होती.

मी पुढारला हात माझा कोरडा मनात भाव ठेऊन,
कुणा इतराच्याच हातात तिची  करंगळी होती.

कळेचना प्रस्ताव कुणाचा, कि उगीचच आळीमिळी होती,
ती नक्कीच चतुराई होती, कि ती खरचं तितुकी भोळी होती.

माझी वाटच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेस वळली  होती,
बघताच भुली पडली  मला माझ्या शपथांची त्यावेळी होती.

अमोल[/size]

gaurig