नफा तोटा

Started by शिवाजी सांगळे, June 04, 2018, 03:51:28 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नफा तोटा

नाही फरक राहिलो जरी तोट्याला
झिडकारतो भोवतालच्या खोट्याला

सारेच इतके हतबल आम्ही झालो   
घेतो इंधन झेपत नसता खिशाला

आसपास असता जगणे महाग जरी
मरतो बळी फुकट विचारा मृत्यूला

मुजोरीच वाढली इतकी जिथे तिथे
उरलाय का वचक कानुनी सोट्याला

विकास बसला रूसून वेशीवरती
नाही हो फुरसत आमच्या दौऱ्याला

मांडतोय खरी गोष्ट इथे मनातली
जाव लागो भले कुणाच्या रोषाला

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९