🌷🌷🌷!!कळी!!🌷🌷

Started by Hemlata Sapkal, June 06, 2018, 07:13:00 PM

Previous topic - Next topic

Hemlata Sapkal

🌷🌷🌷!!कळी!!🌷🌷
एक होती कळी!
गुलाबाची कळी!!
नाजूक साजूक !
हिरवी कळी !!
पाहि मी रोज तिला!
करी नजरेनं बंदी!!
एक होती कळी.....

पाहता पाहता
ती खुलू लागली!
रंग दिसे तिचा
लाल लाल गुलाबी!!
येई पवन तिला
हलकेच जोजवी!
हले,नाचे,डोले
ती तिच्याच स्वप्नी !!
एक होती कळी...

अचानक एक बाई
अक्रीत घडी !
भ्रमर ही येई
तिला शोधून काढी!!
जणू तिही त्याची वाटचं पाही!!
एक होती कळी....

आला भ्रमर फिरे, तिच्या भोवती!
कळी ही घाले,त्याला साद की !!
हळूच भ्रमर जाई तिला स्पर्शुनी!
आणि पाहता पाहता कळीचे फुल होई!!
एक होती कळी...
           

           हेमाराणी