बालपणीचे खेळ

Started by Hemlata Sapkal, June 10, 2018, 10:01:21 PM

Previous topic - Next topic

Hemlata Sapkal

🥇बालपणीचे खेळ🎖
आहाहा काय ती गंमत!
आहाहा काय ती गंमत!!

त्या काचाकवड्या,
ते चल्लस पाणी,
ते सागर गोटे,
अन् त्या बिट्ट्या
आहाहा काय ती गंमत.....

लंगडी,ती कबड्डी
ती साखळी अन् जोडीपाणी!
ती धावाधाव आणि ती मस्ती!!
आहाहा काय ती गंमत....

ती विटी दांडू,ती सुरपारंबी
ती आबादुबी,ती चेंडूफळी!
ती दोरी उडी,ती खापरी
मुलींची हुल्लडबाजी!!
आहाहा काय ती गंमत..

ती भातुकली,ती बाहुली
मनात येई ते खेळ खेळी!
कधी न थकती, कधी न रुसती!!
आहाहा काय ती गंमत..

ती चिंचेच्या बागा,ती आंब्याची राई!
कधी जांभळी, कधी करवंदी
त्यामुळेच खूप मौज येई!!
आहाहा काय ती गंमत...
     
              हेमाराणी