ड्रेसकोड

Started by शिवाजी सांगळे, June 12, 2018, 11:45:58 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ड्रेसकोड

काय सांगू कुणाला कशाचे वेड आहे
बोलणेही कुणा कुणाचे प्री पेड आहे

फेसबुकवरच्या जत्रेतील नव्या जुन्यांना
चिमटे काढण्याची अतरंगी खोड आहे

मागताची कधी चुकून उधार कुणाकडे
नाही म्हणती बंदे थोडीच मोड आहे

म्हटले सरबराई करू जरा पाहुण्यांची
कळले मंडळी सर्व आधीच लोड आहे

जोखती एकदूसऱ्यास कपड्यावरुन हे
पहा पाळताती हल्ली ड्रेसकोड आहे

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९