!!!!शाळेचा पहिला दिवस!!!

Started by Hemlata Sapkal, June 15, 2018, 06:15:18 PM

Previous topic - Next topic

Hemlata Sapkal

!!!!शाळेचा पहिला दिवस!!!

शाळेचा पहिला दिवस!
किती मजा, किती धमाल!!
नवं दप्तर,नवी पुस्तके,,,,,
नव्या वह्या, नवा गणवेश,
नवा बुट,नवा वर्ग,नवा मित्र
सारं कसं नवं नवं!!

धडे नवे, कविता नव्या, बाई पण नव्या!!
नवीन गाणी, नवीन चाली अभ्यास ही नवा!!
किती किती मजा....

पुस्तकांचा तो नवीन वास!
वही चे ते कोरे पान!!
हात फिरवता त्या पानावर
अनुभवस येते स्वर्ग सुख!!

शाळेचा तो वर्ग नवा वर्गाचा कोपरा ही नवा
मित्रांसोबतचा दंगा नवा
अन् शिक्षकांचा ओरडाही नवा!!

शाळेचा तो रस्ता नवा!
दोस्तां सोबत पंगा नवा!
अन् माझा ही तो रूबाब नवा!!
शाळेचा तो पहिला दिवस
किती मजा किती धमाल!!

हेमाराणी !!!