!!मळभ!!

Started by Hemlata Sapkal, June 18, 2018, 06:22:47 PM

Previous topic - Next topic

Hemlata Sapkal

😌😌!!मळभ!!☺☺

होईल दूर हे ही मळभ!
होईल पुन्हा स्वच्छ हे नभ!

पसरेल सुंदर स्वच्छ प्रकाश!
येईल ऐकू विहंगाचे गायन!

येईल हलकेच पहाट वारा!
घालेल फुंकर माझ्या मनाला!

होईल पुन्हा मन माझे प्रसन्न!
उठतील मनी पुन्हा नव्याने तरंग!

सुचतील पुन्हा नव नवे तराणे!
लिहिल पुन्हा मी नव्या जोमाने!!

हेमाराणी