पाऊस (लेवा गणबोली)

Started by Asu@16, June 19, 2018, 04:07:05 PM

Previous topic - Next topic

Asu@16

पाऊस (लेवा गणबोली)

नको नको रे पावसा
आसा लपंडाव खेयु
तुह्या खेयन्या पाई
नको लोकायले छयु

तुह्या एका थेंबासाठी
तरसली धरनी माय
भवतीच्या निसर्गाले
नको दिऊ अंतराय

आसा अंत नको पाहू
धीर सुटला रे मनी
आकाशात पाहीसन
येतं डोयायले पानी

लय मातला मानूस
पन तू रे माय बाप
चुकल्या या लेकरायले
करी टाक गुन्हा माफ

ढग वाजोये ताशा
ईज मारी नभी थाप
असा वाजी गाजीसन
देव कोसयला मोप

-प्रा.अरुण सु.पाटील(असु)
https://www.facebook.com/AsuChyaKavita