लपवन जमलंच नाही

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 04, 2018, 04:36:54 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.लपवन जमलंच नाही*

ओठ बोलतं असतांना मन रमलंच नाही
भेटल्यावर काहीचं लपवन जमलंच नाही

मिठीत घेणं मिठीत येणं
आज पहावं म्हणलं होतं
माझ्या प्रेमाच्या बागेत आलेलं
फुल सुद्धा तोडताना कण्हलं होतं

मनाची बाजू घेता दुःख ही संपलंच नाही
ओठ बोलतं असतांना मन रमलच नाही

रात्री चांदण्यांची आरास
काजव्यांचा खेळ असायचा
मनाची बाजू अलगद झुकायची
चंद्र तुझं रूप घेऊन यायचा

पहाटेच स्वप्नं ते कधी खरं झालंच नाही
ओठ बोलतं असतांना मन रमलंच नाही

मस्करी तरी किती
त्या आरशान करावी
फक्त एक आशा ती
तुला पाहण्याची मनी उरावी

जे दिसलं डोळ्यांना ते मागे उरलंच नाही
ओठ बोलतं असतांना मन रमलंच नाही

ओठांच्या स्पर्शानं तहान
भागवणारा मी चातक नाही
शप्पत खरं सांगू हृदय चोरणारा
मी असा चोर घातक नाही

बोलण्यात तिच्या प्रेम ते  राहिलंचं नाही
ओठ बोलतं असतांना मन रमलचं नाही
भेटल्यावर काहींच लपवन जमलंच नाही

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर