कविता

Started by kumudkadam, July 05, 2018, 01:13:06 AM

Previous topic - Next topic

kumudkadam

झक्कास आहे हो ईथलं सारं

जावे कधी फिरायला नदी काठचा घाट,
पाहवे याची देही याची डोळा
धरञीचा ललकार

झक्कास आहे हो ईथलं सारं

नदी काठाचा ड़ोगरावरचं गार गार वार,
हुडहूडी भरते ईथे आलेवर अंगावरती फ़ार,
मनमंदिर होई वा-यावरती स्वार
झक्कास आहे हो ईथलं सारं...

रान फुलांनी गजबजलेला शिवार,
सुगंध त्यांचा देई आनंद आम्हा फार,
होती जीव जंतू सगळेच इथे टुकार,
झक्कास आहे हो ईथलं सारं...

कडाकपारी खळखळते जलधाराने,
अंतर्मने सर्वांचीच भरती उन्मादाने,
परमार्थ मार्गी लागो ईथेच सर्वार्थाने,
झक्कास आहे हो ईथलं सारं...

दवांतून हसते हिरवे कूरण,
हुदडणारं ईवलं ईवलं हरण,
दिनकर तो सांज-सकाळचा
देखो किती सरेख,
झक्कास आहे हो ईथलं सारं..

राजहंस ते या नगराचे
शिकारी सावट या जंगलाचे,
तोरण खुलविते या विश्वाचे
झक्कास आहे हो ईथलं सारं..

मनमोहक चितथरारक पहाडाचे रप रे,
घेती पाखरे गगनी उंच उंच झेप रे,
येई त्यांस जेंव्हा,थव्याचे रूप रे,
त्यातच वाटे माझे सारे सुख रे
झक्कास आहे हो ईथलं सारं.