कविता..खाकी जागते जेंव्हा

Started by kumud kadam, July 05, 2018, 04:14:20 AM

Previous topic - Next topic

kumud kadam

खाकी जागते जेव्हा

माजतो दानव जेंव्हा
मानवता ही नमते तेंव्हा
हाहाकार गुन्हे करतात जेंव्हा
कर्दनकाळ बनुनी लाठी जागते तेंव्हा

देशाचा घात जेंव्हा
होई रक्तपात तेंव्हा
जळते विस्तवात राष्ट्र जेंव्हा
खाकी रणांगण गाजवते तेंव्हा

आतंक घुसखोरी होते जेंव्हा
संकट भारी येते तेंव्हा
-हास नैतिकतेचा होतो जेंव्हा
शौर्य खाकी दाखवते तेंव्हा

मानवता नांदते तेंव्हा
नाश दुष्टांचा होतो जेंव्हा
स्वातंञ्य लाभते तेंव्हा
खाकी जागते जेंव्हा
सत्यमेव जयते..नारा होतो तेंव्हा