मुकुटपीस

Started by sachinikam, August 06, 2018, 12:14:59 PM

Previous topic - Next topic

sachinikam


मुकुटपीस

तारांगणे जीवनाची, घातली कित्येक पालथी
रुतले पायी खडे किती, हाती फुले प्राजक्ती
निंदले वंदले कुणी, तरी जिंकण्याचीच आस
घेतला वसा सत्याचा, धरली सत्याचीच कास
हाक आकाशाएवढी, मिठी व्याकुळ धरणीस
प्रतीक विजयाचे अखेरी, शिरी खोचले "मुकुटपीस"

वाट तुडवीत फोफाट्याची, रस्ते धुक्याचे कापत
मार्ग क्रमीत कंटकांचे, पथ बिकट चालत
आले गेले चढउतार, वळणापिळणांचा हा संसार
गाठणे शिखर यशाचे, हा एकची विचार
झेप आकाशाएवढी, घातली प्रदक्षिणा धरणीस
प्रतीक विजयाचे अखेरी, शिरी खोचले "मुकुटपीस"
------------------------------------------------------
कवी: सचिन कृष्णा निकम, पुणे.
कवितासंग्रह: मुरादमन
sachinikam@gmail.com