कुटुंब

Started by Asu@16, August 08, 2018, 10:03:26 AM

Previous topic - Next topic

Asu@16

       कुटुंब

संकटी जे धावत येती
त्यास कुटुंब म्हणती
संकटी जे दूर पळती
त्यांची कशात गणती ?

काटा रुतता एका
वेदना दुसऱ्या होती
एकाचे अश्रू पुसण्या
कुटुंबाचे हात येती

राहून एका सदनी
बोल वेगळे वदनी
ऐशा समूहा जगती
कुटुंब का म्हणती ?

उगाच नाती-गोती
वेंधळीच ही भरती
पक्षीही जगण्यासाठी
वृक्षी बांधती घरटी

जखमा दिल्या ज्यांनी
ते तर परकेच होते
वार झेलण्या परंतु
आपले कुणीच नव्हते

दुःख ना जखमांचे
जखमा भरुन येती
दुःख या अंतरीचे
व्यर्थ ही कुटुंब नाती

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
(06.08.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita