पाचोळा

Started by Asu@16, August 14, 2018, 11:31:15 AM

Previous topic - Next topic

Asu@16

             पाचोळा

अशी अद्भुत कशी उगवली
फांदीच्या कुशीत प्रसवली
वाऱ्यासंगे सळसळून हसली
तांबूस नाजूक पाने झळकली

तरुणाई होऊन गर्द हिरवी
अंगी चमकत मिरवी ही रवी
प्रेमाने हसती गाती डोलती
पुष्पकळ्यांना मिठीत घेती

शिशिराचा अन् येता फेरा
हिरवा होई जीर्ण पिवळा
वार्‍यासंगे निरोप सोहळा
तरूतळी पडे मृत पाचोळा

भवरा येऊन कधी वाऱ्याचा
नेई पाचोळा उंच आकाशी
आला कोठून जाईल कोठे
कोडे अवघ्या जना मनाशी

जुने जाऊनि नवीन येते
निसर्ग चक्र असेच फिरते
जुन्या देऊ निरोप हासत
नाविन्याचे करूया स्वागत

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
       (14.08.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita