माझ्या मनातला पाऊस

Started by vishal dhavalekar, August 18, 2018, 12:48:09 AM

Previous topic - Next topic

vishal dhavalekar

नभ उतरून आले
आज जामिनीवरती
मन हरवून गेले
गोड गारव्याच्या मधी

थेंब टीपुस हा आला
मन ओलवुनी गेला
याद तीयेची थोड़ीसी
मग देवूनिया गेला

मन झाले ओलसर
आल्या भावना दाटून
आता ओजळ वाहते
आठवणी साठवून

गेला पाऊस हा आता
झाले कोरडे हे आकाश
असा गोड्सर माझ्या
पावसाचा प्रवास
-विशाल ढवळेकर