जातीचा दाखला

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 20, 2018, 07:37:53 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.जातीचा दाखला*

प्रेम करतांना माणूस जातोचं विकला का
आज रक्त ही मागते जातीचा दाखला का

करून पाहिले प्रेम मी
वेड्या भावना ही वाटल्या
कोण नाही भेटले इथे
फक्त आठवणीचं साठल्या

वेदना माझीचं मला बांध हा घातला का
आज रक्त ही मागते जातीचा दाखला का

गाव राखण असते
रात्र ही जागून सारी
मरण आलेच कधी
तेच असतील खांदेकरी

निघून जाता प्रेमवेडा कलंक लावला का
आज रक्त ही मागते जातीचा दाखला का

रचले जाईल सरण माझे
तेव्हा विश्वास जाईल तुटून
थेंब ही विचारेल तुला गं
पाषाण हृदय आणलेस कुठून

रंग माझा पाहून कफन असा घातला का
आज रक्त ही मागते जातीचा दाखला का

वाटेत उधळलले फुले
गोळा तू करू नकोस
सुगंध गेला असेल त्याचा
खोटी आस मनी धरू नकोस

वेळ निघून जाता हा प्रेमवेडा दिसला का
आज रक्त ही मागते जातीचा दाखला का
प्रेम करतांना माणूस जातोचं विकला का

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर