जपून ठेवलेले अश्रू

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 21, 2018, 11:00:41 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.जपून ठेवलेले अश्रू*

जपून ठेवलेले अश्रू का सांडले आज
जे होते काळजात तेच भांडले आज

नक्षत्र तिचे माझे
कधीच ना जुळले
ओठांवर नेहमीचं
नाव माझे ना रुळले

पंचांग खोटे ठरले तरी प्रेम मांडले आज
जे होते काळजात तेच भांडले आज

रुसवे फुगवे काढता
अधुरे तिचे सांगणे
पूर्ण झाले नाही कधी
तिचे असले भांडणे

होते हितचिंतक माझे जे तेच रडले आज
जे होते काळजात तेच भांडले आज

ओठ कोरडे तिचे
पाणावले मला पाहता
खोटे आसवे नयनी
समोर मी उभा राहता

भाव किती वेडे हे पाहून रांगले आज
जे होते काळजात तेच भांडले आज

देह बोली तिची सुंदर
कटू पणा तिनें खेळला
जन्म होता मजसाठी
पण तिनें मज टाळला

जोडलेले नाते देवाने ते ही संपले आज
जे होते काळजात तेच भांडले आज
जपून ठेवलेले अश्रू का सांडले आज

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर