भार झालो जगावर

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 24, 2018, 06:45:18 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.भार झालो जगावर*

चूक मोठी होती खरे प्रेम केले तिच्यावर
इतका दोषी होतो की भार झालो जगावर

नेहमीच वाहत गेलो
वेडा सदा राहत गेलो
स्वप्न भंगले सारेच ते
जिथं फक्त तुझा होत गेलो

जखम खुणावते त्रास होतो लागल्यावर
इतका दोषी होतो की भार झालो जगावर

सौंदर्य तुझं पाहता
अप्सरा ही लाजली
मला ही मग तू रे
माझीच का भासली

प्रेम झाले पाहून खोट्या आसवावर
इतका दोषी होतो की भार झालो जगावर

उनाड मला म्हणाले
तेव्हा विरुद्ध मी वागलो
तुझ्या मागे मागे येता
जीवनी कायमचा भरकटलो

वेदना वाढल्या तेव्हा धडकलो वादळावर
इतका दोषी होतो की भार झालो जगावर

तुझ्या अशा वागण्याने
नाव सारे ठेवत होते
तिरस्कार करून माझा
चेष्टा सारे करत होते

नाव ठेवणारेचं ते हसत होते व्यथेवर
इतका दोषी होतो की भार झालो जगावर

नाही राहिलो मग मी
कोणाच्याही मनात
तिरस्काराचे ते बोल
पडू लागले कानात

कंटाळलो जीवनाला जातो आता चितेवर
इतका दोषी होतो की भार झालो जगावर
चूक मोठी होती खरे प्रेम केले तिच्यावर

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर