राहून जात

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 28, 2018, 07:08:39 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.राहून जात*

मनात साठलेले तुझे भास शोधणे
बऱ्याचदा राहून जातं श्वास मोजणे

दिलीस जरी तुरी तू
समोर पुन्हा येणार आहे
तुझ्या गुडगुडीत गालाचा
स्पर्श मी घेणार आहे

थांबवं जरा तू ही हृदयाशी खेळणे
बऱ्याचदा राहून जातं श्वास मोजणे

तुझ्या वाचून सखे
अधुर स्वप्न वाटत
दिसत सारं समोर
तरी धुकं हे दाटत

रात्र सरते तरी साखर झोपेत चांदणे
बऱ्याचदा राहून जातं श्वास मोजणे

गोड गळ्याची कोकिळा तू
भ्रमात मज नेहमी पाडते
मग पांढऱ्या शुभ्र घेऱ्यात
जशी तू नाजूक परी दडते

त्या मधुर सुरात मन नकळत डोलने
बऱ्याचदा राहून जातं श्वास मोजणे

गवतावरच्या दवबिंदूने
तुझे रूप अचूक टिपले
तुला पाहण्या रोज मग
नयनांतील अश्रूं ही टपले

का कळल नाही मजसाठी तुझे जन्मने
बऱ्याचदा राहून जातं श्वास मोजणे
मनात साठलेले तुझे भास शोधणे

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर