समुद्र

Started by शिवाजी सांगळे, September 11, 2018, 09:17:38 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

समुद्र

किनाराच तो,
मनाचा...
आवर घालणारा
विचार वारूला...
तापता कधी देह भान
निळसर जळात डुंबवणारा,
अथांग कधी उथळ...
भासातले आभास दावणारा,
दिलासा कधी..।
थकल्या मनाला,
खुजेपणाची
जाणीव देणारा,
नाजुक असा,
उरात पाऊल ठसे
गोंदवून घेणारा...
तरी...ही
अलिप्त राहून...
मोहात पाडणारा...
समुद्र
आणि
त्याचा किनारा...

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९